घरताज्या घडामोडीCBSC EXAM : सप्टेंबरमध्ये होणार १० वी, १२ वीची पुरवणी परीक्षा!

CBSC EXAM : सप्टेंबरमध्ये होणार १० वी, १२ वीची पुरवणी परीक्षा!

Subscribe

CBSC च्या १० आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षांबबात बोर्डाने माहिती दिली आहे. या परिक्षा सप्टेंबर महिन्यात होणार असून त्यांच्या तारखांची घोषणानंतर करण्यात येणार आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहून आढावा घेण्यात येईल आणि नंतरच तारखा घोषीत केल्या जातील असं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या तयारीच्या दृष्टीने ही माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना आता तारखांची उत्सुकता आहे. बोर्ड केव्हा नेमक्या तारखा जाहीर करतो याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सीबीएसईने २०२०-२०२१ सत्राच्या ९ वी आणि १२ वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती.


हे ही वाचा – कोरोना आटोक्यात आल्यावरच धार्मिक स्थळांना परवानगी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -