लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर टिकटॉक व्हीडिओ बनवाल तर पोलिसात तक्रार होईल!

how get money through tiktok app

सध्या कोणत्याही गाण्यावर, चालू घडामोंडीवर लगेचच टिकटॉक व्हीडिओ बनवले जातात. देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. ‘करोना’च्या संकटामुळे संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ असताना त्याचे उल्लंघन करत रस्त्यावर टिकटॉक व्हिडीओ तयार करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी लेखी तक्रार मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरीतील अंबोली पोलिस ठाण्यात सोमवारी केली आहे.

‘फैझल शेख (मुदस्सर शेख), हसनैन खान, सोहैल व फैझ बलोच यांनी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी जमावबंदीचा आदेश मोडून रस्त्यावर येऊन टिकटॉक व्हिडीओ तयार केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका व्हीडिओत मुदस्सरने इमारतीबाहेर येत शुकसुकाट असलेल्या रस्त्याला स्पर्श केला आणि ‘मौत को छु के टक से वापस हा सकता हूं’, असं म्हणत माघारी फिरतो.

या परिस्थितीचा उपहास करणारा करून अन्य नागरिकांनाही त्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न आहे. या ‘टिकटॉक युजर्स’चे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. त्यामुळे असे व्हिडीओ करून ते एकप्रकारे अन्य नागरिकांना सरकारचा ‘लॉकडाऊन’चा आदेश मोडण्यास उद्युक्त करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती अली यांनी पोलिसांना केली आहे.