घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंना यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देताना बोलले होते. या वक्तव्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात माहिला आयोगाकडे तक्रार दाखल झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलने केले. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर महिला आयोग कठोर कारवाईचे आदेश देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पाटलांविरोधात बॅनरबाजी –

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद उमटले. पुण्यात राष्ट्रवादीने बॅनरबाजी करून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. पाषाण सुस रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बॅनर झळकले. एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? असा प्रश्न बॅनरमधून उपस्थित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर आंदोलने –

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंबाबत वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील त्यांच्याविरोधात जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रास्ता रोको करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. भाजपच्या मोठ्या पदावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे व महिलांबाबत असे वक्तव्य करणे त्यांच्या पदाला अशोभनीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.यावेळी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -