घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रछगन भुजबळांविरोधातील तक्रारप्रकरण : आमदार कांदेंना छोटा राजन गँगचा कॉल

छगन भुजबळांविरोधातील तक्रारप्रकरण : आमदार कांदेंना छोटा राजन गँगचा कॉल

Subscribe

नाशिक जिल्हा नियोजन समितीचा निधी परस्पर विक्री केल्याप्रकरणी नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणावरुन दोघांमध्ये द्वंद्व सुरु असतानाच आमदार कांदे यांना मुंबईहून थेट छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन करुन धमकी दिल्याची तक्रार आमदार कांदे यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय व गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

पालकमंत्री भुजबळ व आमदार कांदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खटके उडत आहेत. नांदगावमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर त्यासाठी अतिरीक्त निधी देण्याची मागणी आमदारांनी केली होती. यावेळी आयोजित बैठकीतच दोघांमध्ये खटके उडाले. परंतु, त्यानंतर हे प्रकरण शांत झालेले असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन आमदारांनी थेट न्यायालयातच दावा दाखल केल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे. पालकमंत्री भुजबळांनी १० कोटी रुपयांच्या कामाचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप आमदारांनी केला. त्याविरोधात न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी, यासाठी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने 9664666676 या क्रमांकावरुन कॉल केल्याचे आमदारांनी तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -