घरमहाराष्ट्रआमदार जिग्नेश मेवाणींच्या ट्विटर हँडलरवर पुण्यात गुन्हा दाखल

आमदार जिग्नेश मेवाणींच्या ट्विटर हँडलरवर पुण्यात गुन्हा दाखल

Subscribe

मुक्त महिला पत्रकार शेफाली वैद्यचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करून बदनामी केल्याच्या आरोपावरून आमदार जिग्नेश मेवाणींच्या ट्विटर हँडलरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणमधील पौड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात शेफाली वैद्य या महिला पत्रकारानं तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेनं याआधी याची पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, शहानिशा करून भारतीय दंड संहिता कलम ५००, माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटोशॉप करून मॉर्फ केला फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेवाणीच्या हँडलरकडून २९ मे रोजी त्यांच्या ट्विटर हँडलवरून तक्रारदार यांचा फोटो ट्वीट करण्यात आला होता. हा फोटो फेसबुकवरून डाऊनलोड करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अध्यामिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्यासोबत मॉर्फ करून जोडला होता. तक्रारदार यांचे फोटो परवानगीशिवाय ‘फोटोशॉप’ करून ‘ओ माय गॉड’ या हिंदी चित्रपटातील फोटोशी जोडून बदनामीकारक टिप्पणी करण्यात आली. हा फोटो मेवाणी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून सार्वजनिकरीत्या सर्वत्र पसरवून बदनामी करण्यात आली असं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून होत आहे पुढील तपास

या फोटोमुळे बदनामी झाली असून प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचंदेखील तक्रारदार शेफाली वैद्य तक्रारीत नमूद केलं आहे. मेवाणींच्या ट्विटर हँडलवरून केलेल्या या ट्विटला ३२०० जणांनी लाईक केले; तर ९०० जणांनी रिट्विट केलं होते. मात्र, प्रसिद्ध करण्यात आलेला फोटो हा बनावट असल्याचं लक्षात आल्यानंतर तो फोटो ट्विटर अकाउंटवरून हटवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी पौड पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -