सह्याद्री राईट्स फोरमची आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार, राष्ट्रीय बालहक्क आयोगाची पोलीस आयुक्तांना नोटीस

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना आदित्य ठाकरेंबद्दल नोटीस दिली आहे. याबाबत ह्याद्री राईट्स फोरमने तक्रार केली आहे.

aditya thackeray

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना आदित्य ठाकरेंबद्दल नोटीस दिली आहे. आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा समावेश असल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली असून यात आमदार आदित्य ठाकरेंनी नियमांची पायमल्ली नियमांची केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत 3 दिवसात कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आंदोलनात प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोणी केली तक्रार –

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरमने केली आहे. आरेतील आंदोलनात आदित्य ठाकरेंनी लहान मुलांचा समावेश केला होता. आदित्य ठाकरे यांनी बाल न्याय हक्क संरक्षण कायदा 2015 उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सह्याद्री राईट्स फोरमच्या वतीने केली आहे.याबाबत सह्याद्री राईट्स फोरमने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त, राष्ट्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ईमेल पाठवला होता. या संस्थेने पुरावा म्हणून आदित्य ठाकरेंचे ट्विट मेलमध्ये टाकले होते.

सह्याद्री राईट्स फोरमची बालहक्क आयोगाकडे तक्रार –

आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी रविवारी काही पर्यावरण प्रेमी संस्थांकडून आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनात युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. त्यांनी आंदोलनाचे फोटो ट्विट केले होते. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेल्या फोटोत काही लहान मुलांच्या गळ्यात आरे वाचवाच्या पाट्या लावून त्यांना आंदोलनात सहभागी केल्याचे दिसत आहे. लहान मुलांना राजकीय आंदोलनात सहभागी करुन घेता येत नाही. त्यांना आंदोलनात सहभागी होण्यास भाग पाडणे त्यांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन आहे, अशी तक्रार सह्याद्री राईट्स फोरमने राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आज राष्ट्रीय बालहक्क आयोगाने पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली असून आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.