घरताज्या घडामोडीनागपुरमध्ये ऊर्जा, कोळसा विभागात आर्थिक भ्रष्टाचार, नितीन राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार

नागपुरमध्ये ऊर्जा, कोळसा विभागात आर्थिक भ्रष्टाचार, नितीन राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार

Subscribe

कोळसा, रेती, सट्टा, जमिनीचे व्यवहार नागपुरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नितीन राऊत यांच्या संगनमताने नागपुरमध्ये कोळसा, ऊर्जा विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार अॅड तरुण परमार यांनी ईडीकडे केली आहे. अॅड परमार यांना २८ जून रोजी ईडीने समन्स बजावून त्यांची चौकशी केली होती. यावेळी परमार यांनी भ्रष्टाचारांच्या आरोपांबाबत काही महत्त्वाचे कागदपत्र ईडीला दिले आहेत. तसेच ५ जुलैला ही ईडीकडून समन्स बजावला जाऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरु असताना आता नितीन राऊत यांचेही पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या अॅड परमार यांना चौकशीसाठी उपस्थितर राहण्यास सांगितले होते. ईडीने त्यांची तब्बल साडेतीन तास चौकशी केल्यानंतर सोडले होते. अॅड परमार यांनी आरोपांमध्ये म्हटलं आहे की, कोळसा, रेती, सट्टा, जमिनीचे व्यवहार नागपुरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा या सर्व प्रकरणात सहभागी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर नितीन राऊत यांच्यावर काय कारवाई होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. परंतु परमार यांनी कोणते पुरावे सादर केले आहेत. याबाबत माहिती दिली नाही

- Advertisement -

नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत आणि नागपुर शहरातील प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. तसेच राऊत यांच्या स्वीय्य सहाय्यकांकडून रकमेची देवाण-घेवाण सुरु होती त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात यावी. नागपुराताली पोलीस विभागातील बदल्या, बिगर कृषी जमिनींमधील भ्रष्टाचार, सरकारी जमिनी स्वतःच्या ताब्यात घेणे, हवालाच्या रकमेचे व्यवहार अशा प्रकरणातून शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काँग्रेसमध्ये भाडणं लावण्याचा प्रयत्न

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, आज जी बातमी दाखवण्यात येत आहे ती चुकूची आहे. कुठल्याही पत्र ऊर्जाविभागाच्या विरोधात लिहिले नाही. खनिकर्म विकास महामंडळ जे नागपूरचे आहे. या खनिकर्म महामंडळाच्या कंत्राटबाबत जी निविदा काढण्यात आली होती यामध्ये खुप सारे चुकीचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याविषयावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रात ऊर्जाविभागाचा काही संबंध नाही. काँग्रेसमध्ये भांडणं आहेत असा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माझ्यामध्ये वाद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -