घरमहाराष्ट्रगोरेगाव नेस्कोतील कोरोना सेंटर घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार

गोरेगाव नेस्कोतील कोरोना सेंटर घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार

Subscribe

भाजप आमदार अमित साटम यांनी लोकायुक्तांकडे केली चौकशी मागणी

गोरेगाव नेस्कोमध्ये उभारण्यात आलेल्या समर्पित आरोग्य केंद्राचे काम विकासक रोमेल बिल्डर यांना विनानिविदा देण्यात आल्याने याबाबत तक्रार करूनही आयुक्तांकडून दखल न घेतल्याने भाजपचे आमदार अमित साटम यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली आहे. राज्याचे लोकायुक्त एम. एस. ताहिलियानी यांच्याकडे तक्रार करून साटम यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गोरेगाव नेस्कोच्या जागेत कोरोना काळजी केंद्र अर्थात कोरोना केअर सेंटर दोनची उभारणी केली. परंतु ही उभारणी करताना महापालिकेने रोमेल बिल्डर कंपनीला विनानिविदा दहा कोटींचे काम बहाल केले. यामध्ये या कंपनीला ज्या दरामध्ये भाडेतत्वावर उभे पंखे, खाट, सी. सी. टिव्ही तसेच अन्य वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापेक्षा कमी दरात महापालिकेला यासर्व स्वत: विकत घेता आल्या असत्या आणि महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळता आले असते. त्यामुळे याबाबतचा घोटाळा भाजपचे आमदार अमित साटम यांनी निदर्शनास आणून महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे चौकशीची मागणी केली. परंतु आयुक्तांकडे तक्रार करूनही त्यांनी या प्रकरणाची दखल न घेता त्यावर पडदा टाकण्याचे काम केल्याने अखेर साटम यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

- Advertisement -

हेही वाचा – प्रियांका गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश


या संदर्भात बोलताना साटम यांनी गोरेगावमधील नेस्कोतील कोरोना केअर सेंटरचे काम रोमेल बिल्डरला निविदा न मागवल्याशिवाय कंत्राट दिल्याने यासंदर्भातील घोटाळ्याप्रकरणी मी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. परंतु त्यांची अद्यापही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राज्याचे लोकायुक्त एम. एस. ताहिललियानी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. रोमेल बिल्डरने यापूर्वी कोणत्याही हॉस्पिटल, नर्सिंग होम्सचे काम केलेले नाही. तसेच मेडिकलच्या वस्तू पुरवल्या नाहीत किंबहुना हॉस्पिटल सामग्रीचे ते उत्पादकही नाहीत. तरीही निविदा मागवल्याशिवाय त्यांना महापालिकेने साडेदहा कोटी रुपयांचे कंत्राट थेट दिले. यामध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झालेला संशय दिसून येत आहे. आणि कुणाला तरी फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेने केलेला आहे. त्यामुळे त्याविरोधात लोकायुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच यामध्ये जे दोषी आढळतील त्या व्यक्ती किंवा अधिकारी विरोधात कडक कारवाई करावी, अशाप्रकारची मागणी आपण केल्याचे साटम यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -