Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पंकजा मुंडेंच्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रेचा समारोप, खासदार प्रीतम मुंडेंबाबत व्यक्त केले स्पष्ट...

पंकजा मुंडेंच्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रेचा समारोप, खासदार प्रीतम मुंडेंबाबत व्यक्त केले स्पष्ट मत

Subscribe

भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांनी मागील आठवड्यात 4 सप्टेंबरला शिव-शक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली होती. या यात्रेचा आज समारोप झाला असून या यात्रेची सांगता करताना त्या भावूक झालेल्या दिसल्या.

परळी : भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांनी मागील आठवड्यात 4 सप्टेंबरला शिव-शक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली होती. या यात्रेचा आज समारोप झाला असून या यात्रेची सांगता करताना त्या भावूक झालेल्या दिसल्या. शिवशक्ती परिक्रमा यात्रेची सांगता आज (ता. 11 सप्टेंबर) परळीमध्ये झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले. (Concluding Pankaja Munde Shiva-Shakti Parikrama Yatra)

हेही वाचा – काही काळ थांबा… पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल; व्ही. के. सिंह यांचे मिश्किल विधान

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे यांनी राजकारणातून ब्रेक घेतला होता. ज्यानंतर त्या या महिन्यापासून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. यावेळी बीडमधून शिवशक्ती परिक्रमा यात्रेची सांगता करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रीतम दहा वर्ष खासदार राहीलेली आहे. एकदम तिला घरी बसवून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही. तर दुसरा कोणी घेऊ शकत नाही. पण हा माझा निर्णय झालेला आहे. जगात मी कुठेही निवडणूक लढवेन. पण मी प्रीतमताईंना उचलून काही निवडणूक लढवणार नाही.

तसेच, शिव-शक्ती परिक्रमेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला, स्वागत झाले. लोकांचे खूप प्रेम मिळाले. यात कसलंही शक्तिप्रदर्शन नव्हते, तर ही शक्तीच होती. त्याचे प्रदर्शन मांडण्याची गरज नाही. राजकारण, समाजकारण करत असताना सत्व, तत्व, ममत्व मला महत्वाचे वाटतात, परिक्रमेचा धागा सात्विकतेच्या धाग्याने जोडला होता. परिक्रमा केवळ परिक्रमा नाही तर पराक्रम ठरणार असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.

- Advertisement -

कितीही मोठी झाले तरी गरीबांविषयी सेवेची भावना ही मुंडे साहेबांची आम्हाला शिकवण आहे. त्यांचे नाव हिच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे, आम्हा तिघी बहिणींना त्यांनी वाढवले, चांगले संस्कार केले हे सांगताना त्यांना क्षणभर गहिवरून आले. ही परिक्रमा त्यांना समर्पित करते. एक समाज म्हणून एका उंचीवर जाऊन मुंडे साहेबांनी वंचित, पिडित घटकांसाठी जे काम केले, तसं करायची शक्ती मला मिळाली आहे. ती मी पेलावी अशी प्रार्थना करते, अशी भावना यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -