घरमहाराष्ट्रमहापालिका, विधानसभा निवडणूक घ्या; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

महापालिका, विधानसभा निवडणूक घ्या; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

Subscribe

मुंबई – मुंबई महापालिका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय  ग़हमंत्री अमित शहा, मिंधे सेना त्यांचे चेलेचपाटे आणि मुन्नाभाईला सोबत घेउन सगळे तुटून पडणार आहेत. त्यांना शिवसेना, उद्धव  ठाकरे आणि ठाकरे कुटुंब संपवायचे आहे. पण खरे तर मी याच संधीची वाट पाहत होतो. अमित शहांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी एका महिन्यात मुंबई महापालिका आणि सोबत विधानसभेचीही निवडणूक घेउन दाखवा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजप नेते अमित शहा यांना दिले. शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा करणा-यांना नाही अस्मान दाखविले तर पहा, असेही ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणताहेत त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असल्यासारखे ते लढणार आहेत. होय ही त्यांच्या आयुष्यातील शेवटचीच निवडणूक असेल तर आम्ही आयुष्यातील पहिली निवडणूक असल्यासारखे लढणार असल्याचेही  ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचेही  उद्धव ठाकरे यांनी  ठणकावले.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून मी कमळाबाई म्हणतो, उद्धव ठाकरेंची मेळाव्यात भाजपाविरोधात तुफान बॅटींग

शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी  ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेगट यांच्यावर त्यांनी तुफान टीकास्त्र सोडले. मुंबईसाठी शिवसेनेने सत्तेत असताना काय केले तसेच शिवसैनिकांनी मुंबईकरांसाठी प्राणांचेही बलिदान दिल्याचे दाखलेही त्यांनी दिले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मिंधे सेना, मुन्नाभाईला सोबत घेउन सगळे आता तुटून पडणार आहेत. त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. उद्धव  ठाकरे आणि ठाकरे कुटुंबिय संपवायचे आहे. पण शिवसेना ही काही रस्त्यावर पडलेली झुरळ किंवा ढेकूण नाही की कोणीही येउन चिरडायला. अमित शहा शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा करतात. पण या जमिनीतल्या गवतालाही तलवारीची पाती फुटतात. आम्हीच त्यांना अस्मान दाखवू, असेही  ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – ही पहिली निवडणूक समजून तयारीला लागा; उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना स्फुल्लिंग

बाप पळवणारी टोळी

आतापर्यंत मी मुले पळवणारी टोळी बघितली होती. पण आता बाप पळविणारी टोळी फिरत असल्याची टीका करताना  उद्धव ठाकरे म्हणाले, इतकी वर्षे यांना आम्ही दूध पाजले. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत. मुंबईचे लचके तोडण्यासाठी आता गिधाडे फिरायला लागली आहेत. मुंबई तुमच्यासाठी चौरसफुटाची जमीन असेल. पण आमच्यासाठी ती मुंबाआई आहे,आमची मात़भूमी आहे. आमच्या आईवर जो वार करायला येईल त्याचा राजकारणात कोथळा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

मुंबई आणि या कमळाबाईचा संबंधच काय?संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे आजोबा प्रबोधनकार हे अग्रणी होते. तेव्हा याच जनसंघाने मराठी माणसाची एकजूट फोडली होती. ही त्यांचीच अवलाद आहे, अशी टीका करत ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीत आमची २५ वर्षे सडली याचा पुनरूच्चार केला.

हेही वाचा – तुम्ही जमीन काय दाखवणार, आम्हीच आस्मान दाखवू; उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना खुलं आव्हान

वेदांत परत आणण्यासाठी मी सोबत येतो

आमच्यामुळे वेदांत-फॉक्सकॉन गेला हे धादांत खोटे आहे. गुजरातला गेलेला वेदांत परत आणण्यासाठी चला मी तुमच्यासोबत येतो. एकत्र प्रयत्न करूया असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. पण धारावीत होणारे आर्थिक केंद्रही गुजरातला पळविले. धारावीतल्या रहिवाशांना घर तर निश्चितच मिळाले पाहिजे पण रोजगारासाठी आर्थिक केंद्रही परत आले पाहिजे. एक-एक उद्योग राज्यातून बाहेर जात आहे. पण मिंधे गट हा शेळ्या शेपट्या घालून दिल्लीसमोर मुजरे करत आहे. आता वेदांत गुजरातला गेल्यानंतर केंद्राने लगेचच सवलती दिल्या आहेत. म्हणजे यांचे आधीच ठरले होते. मिंधेगटात हिंमत असेल तर हे पंतप्रधानांना सांगावे.

मी त्यावेळी रूग्णालये, कोविड सेंटर उघडत होतो

भाजप आता जाहिराती करते आहे की आमचे सरकार आले आणि हिंदू सणांवरील विघ्न टळले. कोरोनाच्या काळात देखील यांनी प्रार्थनास्थळे उघडा अशी मागणी केली होती. मात्र मी तेव्हा लोकांचे जीव वाचविण्यासाठी कोविड सेंटर उघडत होतो. आता देखील सगळी बंधने मी हटविली होती. पंढरीची वारी देखील यावर्षी निर्बंधाविनाच साजरी झाली ना असेही उदधव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रासाठी ज्या पायाभूत सुविधा आम्ही निर्माण केल्या त्या संपूर्ण देशात कोणी निर्माण केल्या ते दाखवा, असे आव्हानही उद्धव  ठाकरे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -