घरमहाराष्ट्रपुणेविधानसभा पोटनिवडणुका बिनविरोध करा; राज ठाकरेंचे आवाहन

विधानसभा पोटनिवडणुका बिनविरोध करा; राज ठाकरेंचे आवाहन

Subscribe

येत्या २६ फेब्रुवारीला होऊ घातलेली कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राने आपली राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी महाविकास आघाडीला केले.

येत्या २६ फेब्रुवारीला होऊ घातलेली कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्राने आपली राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी महाविकास आघाडीला केले. भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबापेठ, चिंचवडच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून विरोधी पक्षातील महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. (conduct the Assembly by-elections unopposed Raj Thackeray appeal)

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली होती. भाजपने या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी पत्र लिहून भाजपला अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपने अंधेरी पूर्वमधून आपला उमेदवार मागे घेतला होता. त्यामुळे आताही ठाकरे यांनी कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. तसे पत्र त्यांनी रविवारी ट्विट केले. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते, तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मूळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षालादेखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल, तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

- Advertisement -

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला, तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्या सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणार्‍या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -