घरदेश-विदेशअभिनंदन! महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दुसरा क्रमांक, पहिल्या क्रमांकावर कोण?

अभिनंदन! महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दुसरा क्रमांक, पहिल्या क्रमांकावर कोण?

Subscribe

Maharashtra Chitrarath 2023 | महाराष्ट्राकडून नारी शक्तीवर आधारीत ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेचा चित्ररथ पथसंचालनात सादर केला होता. महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे १० असे २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सहभागी झाली होती.

Maharashtra Chitrarath 2023 | नवी दिल्ली – महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे. प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023) दिल्लीतील कर्तव्य पथावर पथसंचालन झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला (Maharashtra Chitrarath 2023) दुसरा क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्राकडून नारी शक्तीवर आधारीत ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेचा चित्ररथ पथसंचालनात सादर केला होता. महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे १० असे २७ चित्ररथ कर्तव्यपथावर सहभागी झाली होती.

महाराष्ट्राचे यापूर्वी ४० चित्ररथ सहभागी झाले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी झाला. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित केला गेला.

- Advertisement -

महाराष्ट्र संताची आणि देवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात महत्त्वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्धे शक्त‍िपीठ आहे. या शक्तिपीठांना स्त्री शक्त‍िचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले.

कसा होता चित्ररथ

- Advertisement -

चित्ररथाच्या पुढील दर्शनिय भागास गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली होती. समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा होती. त्यांच्यामागे फिरते मंदिर होते. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींच्या प्रतिमा होत्या. यामागे पोतराज आणि हलगी वादकांच्या दोन प्रतिकृती असतील. त्यांच्या समोरील भागात लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करत होते. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा होती. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” हे गीत वाजवले गेले. यासोबतच कर्तव्यपथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे कलाकार नृत्य सादर करण्यात आले होते. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती.

उत्तराखंडचा पहिला क्रमांक

आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे 17 चित्ररथ प्रदर्शित यावेळी सहभागी झाले होते. या माध्यमातून देशाच्या भौगोलिक आणि समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले गेले. उत्तराखंडचा पहिला क्रमांक तर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -