घरताज्या घडामोडीपीएम मोदींनी केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार गोपाळ शेट्टींच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन

पीएम मोदींनी केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार गोपाळ शेट्टींच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात खासदार गोपाळ शेट्टींच्या घराबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी शेट्टींच्या घराजवळ मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच गोपाळ शेट्टींनी आणि पीएम मोदींनी माफी मागावी, अशा प्रकारची घोषणा आंदोलकांकडून करण्यात आली.

पीएम मोदींनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन

नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर टीका केली होती. तसेच महाराष्ट्र कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरला त्यामुळे देशात कोरोना पसरला, असा दावा मोदींनी केला होता. याविरोधात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आंदोलन पुकारलं आहे. मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वात खासदार गोपाळ शेट्टींच्या घराबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं.

- Advertisement -

काँग्रेसकडून आंदोलन सुरू असताना गोपाळ शेट्टींच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते जमले होते. मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनात महिलांचा देखील समावेश होता.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील भाजप पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. मोदीजी माफी मांगो अशी घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पसरवण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या खासदारांना टार्गेट केलंय.

- Advertisement -

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी ?

देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची टीका मोदींनी काँग्रेसवर संसदेत केली होती. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत संपूर्ण देश लॉकडाऊनचं पालन करत होतं. तसेच जागतिक आरोग्य संघटना संपूर्ण जगाला सल्ला देत होती की, जो नागरिक ज्या ठिकाणी आहे. त्याने त्या ठिकाणी निवास करावा. संपूर्ण जगात हा संदेश दिला जात होता. त्यावेळी काँग्रेसने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून मजुरांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोस्ताहित केलं. तसेच तेथील मजुरांना मोफत तिकिटं वाटण्यात आली. मुंबई सोडून जाण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रावरील भार कमी करण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. कोरोना काळात काँग्रेसने हे मोठं पापं केलं. गोंधळाचं वातावरण निर्माण करण्यात आलं, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला होता.


हेही वाचा : Guru Ravidas Jayanti 2022: पंतप्रधान मोदींची रविदास विश्रामधाम मंदिराला भेट, मंजिरा वाजवत कीर्तनात दंग


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -