Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रCongress :आका-आका, रेती-रेती, भाजप - मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवरुन; सुरेश धसांबद्दल काँग्रेसचा हल्लाबोल

Congress :आका-आका, रेती-रेती, भाजप – मुख्यमंत्र्यांच्या सूचनांवरुन; सुरेश धसांबद्दल काँग्रेसचा हल्लाबोल

Subscribe

बुलढाणा – पहिले आका, आका आका, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती रेती, टिप्पर, टिप्पर, टिप्पर असे रांगड्या भाषेत मांडल्या जात होते. मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली, मांडवली, मांडवली, असे शब्द ऐकू येऊ लागले आहे, असा जोरदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांना लगावला आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावरुन आक्रमक झालेले आमदार सुरेश धस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांत रान उठवले होते. मात्र त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी धसांनी मुंडेंची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांच्या मतभेद आहेत मनभेद नाही असे सांगीतले. यामुळे आमदार सुरेश धसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आमदार धसांच्या या बदललेल्या भूमिकेवर काँग्रेसने टीका केली आहे. महायुतीवरच धर्मसंकट ओढावले आहे, असा टोला प्रदेशाध्यक्ष हर्धवर्धन सपकाळ यांनी लगावला आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ

संतोष देशमुख हत्याकांडानंतर आमदार सुरेश धस हे सर्वाधिक आक्रमक होते. त्यांनी परळी विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारापासून धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील पीकविमा घोटाळा, न झालेल्या रस्ता कामाची उचललेली 73 कोटींची बीलं, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत, परळीमध्ये झालेले 109 मर्डर, रेती माफिया, राख माफिया, पीकविमा माफिया, असे अनेक आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा राजीनामा का घेत नाही, असा सवाल केला होता. गेल्या आठवड्यात सुरेश धसांनी धनंजय मुंडेची मुंबईत भेट घेतली. साडेचार तास त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर परळीतील त्यांच्या घरी जाऊनही ते त्यांना भेटले असल्याचे समोर आले. हे स्वतः आमदार धसांनीही कबूल केले. यामुळे आता आमदार धस हे मॅनेज झालेत का असा आरोप होत आहे. त्यावरुन काँग्रेसनेही टीका केली आहे.

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना सूचना दिलेली होती. त्यामुळेच ते आधी आका, आका, आका. नंतर बंदूक, बंदूक, बंदूक, टिप्पर, टिप्पर, टिप्पर असे रांगड्या भाषेत बोलत होते. आता त्यांचे हे सगळे शब्द मागे पडले आणि आता मांडवली, मांडवली शब्द ऐकू यायला लागले आहेत, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

हेही वाचा : New Delhi stampede : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीने पंतप्रधान मोदी व्यथित