घरमहाराष्ट्रCongress : भाजपाचे हीन राजकारण अधोरेखित होते, सचिन सावंतांचा पीयूष गोयलांवर निशाणा

Congress : भाजपाचे हीन राजकारण अधोरेखित होते, सचिन सावंतांचा पीयूष गोयलांवर निशाणा

Subscribe

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे आणि लवकरच या व्हिजनची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विविध स्तरावर चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पीयूष गोयल यांच्या माध्यमातून भाजपावर शरसंधान केले आहे.

हेही वाचा – Loksabha Election 2024 : शिवसेना 16 जागांवर ठाम; संजय शिरसाट यांचा दावा

- Advertisement -

उत्तर मुंबईतील भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली आहे. झोपडपट्टीत राहणे कोणालाही आवडत नाही, केवळ नाईलाज म्हणून राहावे लागते. त्यांना झोपडपट्टीतून कसे बाहेर काढायचे, त्यांना सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे जीवन कसे द्यायचे हे आपल्यावर आहे. गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांसह सर्व मुंबईकरांची काळजी घेणारे उपाय शोधणे आवश्यक आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे.

देशभरात मीठ तयार करण्यासाठी वापरल्या जात नसलेल्या मिठागराच्या जमिनींचा वापर सार्वजनिक गृहनिर्माण किंवा पुनर्वसनासह अन्य कारणांसाठी केला जाऊ शकतो. भारतात सुमारे 60,000 एकर मिठागराची जमीन असून यापैकी जागांवर मिठाचे उत्पादन होत नाही, असेही त्यांनी सांगितले. याद्वारे झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी या जमिनींचा वापर करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – BJP : हे कोणत्या नीतिमत्तेत आणि संस्कृतीत बसते? ठाकरे गटाचा भाजपाला सवाल

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे. पीयूष गोयल यांचा झोपडपट्टीवासीयांबद्दलचा दृष्टीकोन हा संवेदनशील नसून त्यांची घृणा करणारा असा अत्यंत निषेधार्ह आहे. आंतरराष्ट्रीय नेत्यांना झोपडपट्ट्यांतील आपले बांधव दिसू नयेत यासाठी रस्त्यावर पडदे लावणारा हाच तो दृष्टीकोन असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या बांधवांचे जीवनमान सुधारावे, यासाठी त्यांच्या जागेवरच घरे बनवून दिली पाहिजेत. भाजपा आणि अदानी हे धारावीमधील जनतेला मुलुंड येथे हद्दपार करत आहेत. पीयूष गोयल उत्तर मुंबईतील जनतेला हद्दपार करून मिठागराच्या जमिनीवर पाठवू इच्छितात. झोपडपट्टीत राहणारे आमचे बांधव ही माणसे आहेत, असे सांगतानाच, मेट्रो कारशेडला उपलब्ध न होणारी खारजमीन या कारणासाठी होईल, असे गोयल म्हणतात यातच भाजपाने केलेले हीन राजकारण अधोरेखित होते, असे त्यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Loksabha Election 2024 : अखेर (शिव)तारे जमीं पर; बारामतीमधून माघार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -