घरताज्या घडामोडीLegislative Council Election: भाजपला रामराम ठोकणाऱ्या छोटू भोयर यांना काँग्रेसकडून बावनकुळेंविरोधात उमेदवारी

Legislative Council Election: भाजपला रामराम ठोकणाऱ्या छोटू भोयर यांना काँग्रेसकडून बावनकुळेंविरोधात उमेदवारी

Subscribe

नागपूरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार निश्चित केला आहे. भाजपला काल, सोमवारी रामराम ठोकणारे छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केला आहे. काँग्रेसमध्ये कालच प्रवेश केलेले छोटू भोयर आता विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात लढणार आहेत. त्यामुळे आता नागपूरच्या रिंगणात भोयर विरुद्ध बावनकुळे लढत होणार आहे.

काल, सोमवारी छोटू भोयर यांनी भाजपसोबतचा ३४ वर्षांच्या प्रवास संपवला आणि त्यांनी काँग्रेसमधून प्रवास सुरू केला. नागपूर शहर काँग्रेसच्या देवडिया काँग्रेस भवनातून त्यांनी काँग्रेसमधील प्रवासाला सुरुवात केली. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यासह नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक उपस्थितीत होते. भाजपमध्ये असताना भोयर चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. भोयर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. मात्र आता काँग्रेसने भोयर यांच्यावर अधिक विश्वास दाखवून त्यांना विधान परिषद निवडणुकीचं तिकिट दिलं आहे.

- Advertisement -

भाजप सोडल्यानंतर काय म्हणाले भोयर? 

 

- Advertisement -

पक्ष सोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना छोटू भोयर यांनी त्यांची भूमिका मांडली. भाजपसाठी ३४ वर्षांपासून झटत आलोय. पण त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला, मला दाबण्यात आलं. अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं भोयर यांनी सांगितलं.


हेही वाचा – भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -