घरताज्या घडामोडीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची ‘चुल’

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची ‘चुल’

Subscribe

गॅस दरवाढीविरोधात नोंदवला निषेध

गॅस आणि पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडत असल्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे तर गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्येही सातत्याने वाढत होत आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. आज काँग्रेसच्यावतीने नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडत दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरांत पेट्रोलने शंभरी पार केल्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कित्येकांना स्वतःच्या खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी नागरिकांकडून केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला जातोय. याच कारणामुळे काँग्रेसच्यावतीने आज चूल मांडत चुलीवर बिना तेलाच्या पदार्थांचा स्वयंपाक तयार करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेविका आशा तडवी, माजी नगरसेवक शिराज भाई कोकणी, मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश खैरे, सुरेश मारु, स्वप्नील पाटील, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, माजी नगरसेविका डॉ सुचेता बच्छाव, अनिल बहोत, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हनिफ बशीर, समीना पठाण, चारुशीला शिरोडे, मीराताई साबळे, मुन्ना ठाकूर, कल्पना पांडे, दाऊद शेख, यांच्यासह महिला व युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

सर्वसामान्य महिलांना घर चालवणे जिकरीचे व कठीण झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला व महिलांना निवडणुकीच्या काळामध्ये मोठमोठी आश्वासने दिली होती, परंतु त्या आश्वासनांची पूर्ती करता आली नाही. केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी एखादे आर्थिक पॅकेज जाहीर करावे. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आम्ही निषेध नोंदवतो.
वत्सला खैरे, अध्यक्षा, महिला काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -