घरमहाराष्ट्रमोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वामुळे भारताची जगात आघाडी; इंधनदरवाढीवर काँग्रेसची टीका

मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वामुळे भारताची जगात आघाडी; इंधनदरवाढीवर काँग्रेसची टीका

Subscribe

इंधन दरवाढीवर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. सातत्याने केंद्रातील भाजपवर निशाणा साधत आहेत. आज पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला आहे. इंधनावर सर्वांत जास्त कर भारत आकरतो, असा तक्ता काँग्रेसने शेअर केला आहे. हा तक्ता शेअर करताना मोदी सरकारच्या कार्यकर्तृत्वामुळे भारताची जगात आघाडी, असं म्हणत टोला लगावला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलं आहे. यामध्ये एक तक्ता शेअर केला आहे. त्यात देश आणि इंधनावरील कर याची माहिती दिली आहे. यात जर्मनी, इटली, युके, जपान, अमेरिका आणि भारत आहे. इंधनावरील सर्वात जास्त कर भारत आकरतो. इंधनावर २६० टक्के इतका कर भारत आकरतो, असं तक्त्यात म्हटलं आहे. मोदी सरकारच्या कर्तुत्वामुळे भारताची जगात आघाडी असा टोला लगावत या उत्तुंग भरारीसाठी मोदी सरकारचं कौतुक करावं तरी किती? असा उपहासात्मक सवाल देखील केला आहे. एवढंच नाही विकासाच्या बाबतमी नाही पण इंधन दरांच्या बाबतीत मोदींनी भारताला जगात आघाडीवर आणले, असा टोला लगावला.

- Advertisement -

इंधन दरवाढीवरुन काँग्रेस गेले काही दिवस केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. विविध राज्यांमध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं जात आहे. सोमवारी काँग्रेसने इंधन दरवाढीवरुन ककेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला. निर्मला सीतारमण यांचे व्हिडिओ शेअर करत सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना कसं विधान करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने हिच ढोंगीजीवींची ओळख असल्याचं म्हणत निशाणा साधला.


हेही वाचा – Video: कथनी, करणीमध्ये फरक, हीच ढोंगीजीवींची ओळख; काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -