ऑपरेशन कमल फ्लॉप! महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात भाजपचा पक्ष फोडण्याचा डाव; काँग्रेसचं टीकास्त्र

Congress dinesh gundu rao attackt bjp over goa congress crisis

गोव्यात काँग्रेस पक्षावर असलेली संकट अद्याप कमी होण्याचे नाव घेत नाही, यातच भाजपचं ऑपरेशन कमल फ्लॉप झाल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी भाजपवर सोडले आहे. यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्यावरही काँग्रेसने अनेक आरोप केलेत. पक्षातील काही नेते रविवारी नॉट रिचेबल आल्याने ते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राव हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी राव म्हणाले की, आमच्या एकनिष्ठ असलेले कोण आणि पक्षांतर करणारे कोण आहेत हे आम्हाला ठावूक आहे. यात भाजपकडून आणखी एक प्रयत्न झाला, पण तो फ्लॉप ठरला. दबाव असून आमचे तरुण आणि प्रथम निवडून आलेले आमदारसोबत आहेत. गेल्या महिन्याभरापासून हे कारस्थान सुरु आहे.

राव पुढे म्हणाले की, भाजपचं ऑपरेशन कमल पूर्णपणे अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रयत्न केले पण त प्रयत्न अपयशी ठरले. भाजपने महाराष्ट्राप्रमाणेच पक्षाचे दोन तृतीयांश आमदार फोडून आपली संख्या 25 वरून 33 वर नेण्याचा प्लॅन आखला. असे झाले असते र भाजपची संख्या ४० पैकी ३३ एवढी झाली असती, तसेचे ते विरोधी पक्ष मुक्त झाले असते. इतकेच नाही तर काँग्रेस आमदारांशी संपर्क करणारे भाजप नेते त्यांच्यासोबत फक्त पैशांबाबत नाही तर ईडी आणि आयकर रेडची धमकी दिली असा आरोप राव यांनी केला.

आमदारांवर खदान, कोळसा आणि उद्योगांसह अनेक ठिकाणांवरूनही दबाव टाकण्यात येत होता. इतकेच नाही तर काँग्रेसकडे 7 आमदार आहेत, असा दावाही राव यांनी केला आहे. याचबरोबर चार नेते पक्षासोबत नाहीत. यांत मायकल लोबो, दिगंबर कामत, केदार नाईक आणि डेलिलाया लोबो यांचह समावेश आहे. अस स्पष्टीकरण राव यांनी दिले आहे. तर मंत्र्यांना आकर्षित करण्यासाठी भाजप किती खालच्या पातळीवर उतरली आहे हे लज्जास्पद बाब असल्याचा आरोपही राव यांनी केला आहे.


ओबीसी राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात १९ जुलैला सुनावणी