घरताज्या घडामोडीसातव यांचा निधनामुळे महाराष्ट्राला फार मोठा धक्का बसलाय- विश्वजीत कदम

सातव यांचा निधनामुळे महाराष्ट्राला फार मोठा धक्का बसलाय- विश्वजीत कदम

Subscribe

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ”राजीव सातव यांचा निधन महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का बसला असून काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अत्यंत कमी वयात राजीवजी सातव यांनी अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसह युथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद भूषविले. हिंगोलीमध्ये एक आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामातून व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला. असं राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे.

“सातव यांचा स्वभाव अत्यंत मोकळा आणि लोकांशीही ते मनमोकळेपणाने वागत होते. एका आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी देशात उत्तम कामगिरी केली. माझे व्यक्तिगत संबंध फार भावासारखे होते कारण ते महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष होते तेव्हा मी उपाध्यक्ष होतो. जेव्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा मला महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतु राजीव सातव यांचा निधनामुळे महाराष्ट्रासह काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. मी सातव यांचा कुटुंबियांचा दु:खात सहभागी होत सातव यांचा आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरा चरणी प्रार्थना करतो. अशा सातव यांच्यासोबतचा आठवणींना उजाळा देत विश्वजीत कदम यांनी सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

“सातव यांच्या पार्थिवावर उद्या हिंगोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देशाचे राज्य सभेचे खासदार आदरणीय राजीवजी सातव यांनी २१ तारखेला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली. २३ तारखेला ते कोरोनावर उपचार घेण्यासाठी पुणे येथील जहांगीर रुग्णालात दाखल झाले. यात २५ ते २६ तारखेदरम्यान कोरोना आजारामुळे त्यांची तब्येत दुर्दैवाने खालवत गेल्याने त्यांना ऑक्सिजनची खूप गरज लागली. गेल्या आठवड्या भरामध्ये अनेक दिवसांचा उपचारांनंतर त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली. परंतु फुफ्फुसांवर विषाणुने गंभीर परिणाम केल्यामुळे आणि या बँक्टेरियल इंफेक्शनचे रुपांतर न्युमोनियामध्ये झाल्याने त्यांचा फुफ्फसांचे कार्य पूर्णपणे बिघडले. यादरम्यान जहांगीर रुग्णालयातील डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी राजीव सातव यांचा उपचारांसाठी मेहनत करत होते. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर राहुल पंडित यांनी पुण्यात येत सातव यांचा सर्व रिपोर्टची पाहणी करत त्यांचे जहांगीर रुग्णालातील डॉक्टरांशी बोलणे सुरु होते. परंतु या विषाणुच्या गंभीर प्रभावामुळे त्यांचे फुफ्फुसांचे कार्य पुर्णपणे बिघडले आणि आज पहाटे ४.५८ मिनिटांनी राजीवजी सातव यांचे दु:ख निधन झाले आहे.” अशी माहिती विश्वजीत कदम यांनी आज दिली.

“अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसह, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरातजी आणि तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचावतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहतो.”असेही विश्वजीत कदम म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -