घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर, अशोक चव्हाण यांनी केली 'ही' तक्रार

महाविकास आघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर, अशोक चव्हाण यांनी केली ‘ही’ तक्रार

Subscribe

परभणीत शुक्रवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता. या मेळाव्यामधील भरसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तक्रार केली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. मुख्यमंत्री काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना निधी देत नसल्याची तक्रार अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच भाजपकडून काँग्रेस संपवण्याचे षढयंत्र रचले जात होत, म्हणूनच शिवसेनेसोबत सत्तास्थापन केली, असे मोठे विधान देखील अशोक चव्हाण यांनी भरसभेत केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नक्की काय म्हणाले अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण म्हणाले की, ‘काँग्रेसशासित महापालिकांना मुख्यमंत्री निधी मिळत नाही. नांदेडला मिळाला नाही. पण आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला.’ अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील खदखद समोर आल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

तसेच अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ‘दिल्लीमधील नेत्यांमध्ये शिवसेनेसोबत जाण्याबद्दल नाराजी होती. दुसरीकडे राज्यात काँग्रेस संपवण्याची कारवाई भाजपाची सुरू होती. त्यामुळे राज्यातील सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामी व्हावे लागले. हे मी स्वतः जाऊन दिल्लीतल्या नेत्यांना पटवून दिलं. त्यानंतरच महाविकास आघाडीत आपण सामील झाले.’


हेही वाचा – राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -