घरताज्या घडामोडीराफेलचे सत्य समोर आले पाहिजे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी

राफेलचे सत्य समोर आले पाहिजे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी

Subscribe

राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर आपल्याकडे का नाही ?

राफेलच्या व्यवहारात गौडबंगाल असून या व्यवहारात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी फ्रान्समध्ये सुरू झाल्याने आपल्याकडेही चौकशी करून सत्य जनते समोर आले पाहिजे, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी केली. मोदी सरकारने राफेल व्यवहाराची चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. परंतु सत्य जास्त दिवस लपत नसते. फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरु झाली असून, मग भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही, असा सवालही थोरात यांनी केला.

युपीए सरकारच्या काळातच १२६ राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते. परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे १ हजार ६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेराफेलचे सत्य समोर आले पाहिजे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी च मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला कंत्राट देण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते. परंतु त्याकडे नेहमीप्रमाणे मोदी सरकारने दुर्लक्ष करुन हे प्रकरण गुंडाळले, असा आरोप थोरात यांनी केला.

- Advertisement -

राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली. मात्र, भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचे काम केले जात आहे. मोदी सरकार चौकशी करायला का घाबरत आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी चौकशीपासून पळ काढला जात आहे. राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे, असे थोरात म्हणाले.

संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा : पटोले

दरम्यान, राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तशी भारतातही या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -