राजकीय जोर बैठका सुरूच; आता बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या घरी

Congress leader balasaheb thorat meets nsp president sharad pawar
राजकीय जोर बैठका सुरूच; आता बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या घरी

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या सदिच्छा भेटीगाठींना बहर आला आहे. महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं. बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. ३१ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, आता बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याम राजकीय जोर बैठकांचं सत्र सुरूच आहे.

शरद पवार आमचे मार्गदर्शक

तथापि, या भेटीनंतर थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार आमचे मार्गदर्शक असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत महामंडळांच्या जागावाटपावर आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. सत्तेतील तिन्ही पक्षांना महामंडळाच्या समान जागा मिळतील, असं थोरात म्हणाले.