घरमहाराष्ट्रआमच्या भेटीनंतर सामनाने पुन्हा अग्रलेख लिहावा - बाळासाहेब थोरात

आमच्या भेटीनंतर सामनाने पुन्हा अग्रलेख लिहावा – बाळासाहेब थोरात

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तणावाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर जुनी खाट अधूनमधून कुरकुरते असा उपहासात्मक टोला काँग्रेसला लगावला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही बदलासाठी आम्ही आग्रही नाही आहोत. राज्यातील जनतेच्या हितासाठी निर्णय घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. खाटेचं किमान ऐकूण तरी घ्यावं. त्याने शंकेचं निरसन तरी होईल, असं थोरात म्हणाले.

प्रशासनातील अधिकाऱ्यांवरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे अशी चर्चा आहे. यासंदर्भात आज बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. याआधी बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम्ही बदल्यांसाठी आग्रही नाही आहोत. तर राज्याच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत, अशी आमची अपेक्षा आहे. खाटेची कुरकुर ऐकून घ्यावी. मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही आमची भूमीका मांडू. काँग्रेस भक्कमपणे आघाडी सोबत आहे. सामनाने अपूर्ण माहिती घेऊन अग्रलेख लिहिला आहे. आजच्या अग्रलेखातून काँग्रेसबद्दलची चूकिची माहिती गेली आहे आमचं म्हणणं ऐकल्यानंतर मुख्यमंत्री समाधानी होतील. आमची भेट झाल्यानंतर सामनाने अग्रलेख पुन्हा लिहावा,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – जुनी खाट अधूनमधून कुरकुरते; सामनातून काँग्रेसला चिमटा


जुनी खाट अधूनमधून कुरकुरते

प्रशासनातील अधिकाऱ्यांवरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू असं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. यावर आता ‘सामना’तून काँग्रेसला चिमटा काढण्यात आला आहे. जुनी खाट अधूनमधून कुरकुरते अशा शब्दांत सामनातून काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर निशाणा साधला आहे. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा अप्रत्यक्ष इशारा देखील भाजपला दिला आहे.

- Advertisement -

“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये” अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर भाष्य करण्यात आलं आहे, तर भाजपला अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -