फडणवीसांचा सागर बंगला ‘वॉशिंग मशीन’चं काम करतोय; शुक्ला-फडणवीसांच्या भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

या फोन टॅपिंग प्रकरणात आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आह

congress leader balasaheb thorat slams rashmi shukla bjp devendra fadanvis meet sagar resident

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी कालच्या राजकीय घडमोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला देखील फडणवीसांच्या निवासस्थानी पोहचल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस – रश्मी शुक्ला यांच्या सागर बंगल्यावरील भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या भेटीवर आता काँग्रेसने टीकास्त्र डागले आहे. फडणवीस वॉशिंग मशीन झालेत, फडणवीसांचा सागर बंगला वॉशिंग मशीनचे काम करत असेल. अशा शब्दात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

या फोन टॅपिंग प्रकरणात आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचप्रकरणावर आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.


पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; ‘या’ मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता