पटोले महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’, प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा ; काँग्रेस नेत्यांची दिल्लीत धाव

Nana-Patole
संग्रहित छायाचित्र

मागील काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, अशी विनंती काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आली आहे. राज्यातील अनेक नेते दिल्लीत ठाण मांडून बसले असून या नेत्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतली. नाना पटोले यांचा राज्यातील कोणत्याही नेत्याशी समन्वय नाही. ते कोणालाच बरोबर घेत नाहीत. अलीकडेच प्रदेश काँग्रेस कमिटीची वीज कापण्यात आली. परंतु नाना पटोले हे महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’ झाले आहेत. काँग्रेसला वाचवायचं असेल तर पटोलेंना हटवावे लागेल, असंही अनेक नेत्यांनी सांगितलं आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकारिणीचे गठण झाल्यानंतर लगेच महाराष्ट्राबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी या नेत्यांना दिले आहे. त्यामु्ळे आता खरगे काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : “शासन आपल्या दारी” कार्यक्रमात कोणाला जबरदस्ती आणलेलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला