घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकाँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी घेतले त्र्यंबकराजाचे दर्शन

Subscribe

एसआयटी नेमा मात्र अश्लिल वक्तव्य करणार्‍यांवर कारवाईही करा

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील धूप प्रकरणानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देत जिथे वाद झाला त्या मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ जाऊन दर्शन घेतले.धार्मिक सलोखा बिघडवणारे केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच नाही तर सार्‍या महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. राज्यभर मोर्चे काढून धार्मिक सलोखा बिघडवला जात असून ते मोर्च्यात अश्लाघ्य भाषा वापरतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नक्कीच नेमावी परंतू अश्लाघ्य भाषा वापरणार्‍यांवरही कारवाई करावी अशी मागणी दलवाई यांनी केली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलतांना दलवाई म्हणाले मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एवढेच म्हणेल की, तुम्ही त्र्यंबकेश्वर धुप प्रकरणात एसआयटी नेमा; पण ज्या लोकांनी राज्यभर मोर्चे काढून अश्लाघ्य भाषा वापरली त्यांच्या विरोधात काही तरी करा. त्या दहा बारा संघटना आहे, त्यांना कुठला फंड मिळतो, ते काय करतात लोकांना काय शिकवतात त्यांची चौकशी करा. धुप अर्पण करण्याची ही परंपरा शंभर वर्षांपासूनची आहे. बाबा शहा यांचा संदल येथे येतो ती चांगली गोष्ट आहे. धार्मिक सलोखा येथे आहे. ज्यांनी धुप अर्पण केला त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट जे धुप अर्पण करणार्‍यांच्या विरोधात आहे आणि तेथे संदल आणला म्हणून ज्यांना राग आहे त्यांनी धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -