घर देश-विदेश सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवताच काँग्रेसच्या 'या' मोठ्या नेत्याने केली टीका

सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवताच काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याने केली टीका

Subscribe

24 तासांच्या आत तांत्रिक कारण देत अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबविण्यात आल्याने आता काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

नवी दिल्ली : अभिनेता आणि गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील बंगल्याचा होणारा लिलाव थांबवण्यात आला आहे. यासंदर्भात बँक ऑफ बडोदाकडून आज (ता. 21 ऑगस्ट) एक निवेदन काढण्यात आले. या निवेदनात बँक ऑफ बडोदाने म्हटले की, तांत्रिक बिघाडामुळे बंगल्याचा लिलाव थांबवण्यात आला आहे. यामुळे सनी देओल यांना बँक ऑफ बडोदाकडून मोठा दिसाला मिळाला आहे. परंतु 24 तासांच्या आत तांत्रिक कारण देत बंगल्याचा लिलाव थांबविण्यात आल्याने आता काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याबाबत ट्वीट केले आहे. (Congress leader Jairam Ramesh criticized for stalling the auction of Sunny Deol’s bungalow)

हेही वाचा – सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवला; वाचा काय आहे प्रकरण

- Advertisement -

बँक ऑफ बडोदाने सनी देओलला 56 कोटींच्या थकबाकीसंदर्भात नोटीस पाठविली होती. यामुळे बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात देखील काढली होती. पण बँकने जाहिरात काढल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव थांबवला. याबाबत ट्वीट करत जयराम रमेश यांनी लिहिले आहे की, “काल दुपारी, देशाला कळले की बँक ऑफ बडोदाने भाजप खासदार सनी देओल यांचे जुहू येथील निवासस्थान ई-लिलावसाठी ठेवले आहे. कारण त्यांच्याकडे बँकेचे 56 कोटी रुपये थकले आहेत. आज सकाळी 24 तासांपेक्षा कमी वेळात, देशाला कळले की बँक ऑफ बडोदाने ‘तांत्रिक कारणांमुळे’ लिलावाची सूचना मागे घेतली आहे. त्यामुळे बँकेला ही ‘तांत्रिक कारणे’ सांगण्यास कोणी प्रवृत्त केले?” असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून 55.99 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड सनी देओलने अद्याप केलेली नाही. यामुळे बँकेने कर्ज वसुल करण्यासाठी सनी देओलला बंगल्याच्या लिलावाची नोटीस बजावली होती. यासंदर्भात बँकेने लिलावाची किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. बँकेने काढलेल्या जाहिरातीत म्हटले की, अजय सिंग देओलच्या ‘सनी व्हिला’ या बंगल्याचा लिलाव 25 सप्टेंबरला होणार आहे. सनी देओलचा बंगला हा जुहूच्या गांधी ग्राम रोडवर असून या बंगल्यात सुपर साउंड नावाचा रेकॉर्डिंग आणि डबिंग स्टुडिओ चालविला जातो. या बंगल्यात चित्रपटगृह, पूल, हेलिपॅड एरिया आणि गार्डन या सर्व सुविधा आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -