Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona vaccination : एकट्या गुजरातला ६० टक्के लसीचा कोटा, कॉंग्रेसचा आक्षेप

Corona vaccination : एकट्या गुजरातला ६० टक्के लसीचा कोटा, कॉंग्रेसचा आक्षेप

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीच्या काळात गुजरातला अधिक लसींचा पुरवठा केल्यामुळे कॉंग्रेसने केंद्रावर टीका केली आहे. केंद्राकडून राज्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या कोट्यामध्ये गुजरातला मोठा वाटा मिळ्यामुळे त्यांनी केंद्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्राकडून एकट्या गुजरातमध्ये ६० टक्के लसीचा कोटा देण्यात आला. या केंद्राच्या पक्षपातीपणावर कॉंग्रेस नेते जयराम रमेश तोफ डागली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत एकट्या गुजरातला मोठा लसींचा साठा का दिला गेला ? असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यासोबतच केंद्राकडून कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या लसींच्या पुरवठ्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणाले जयराम रमेश ?

- Advertisement -

एकट्या गुजरातलाच लसीचे ६० टक्के डोस कसे मिळतात ? देशात २ मे रोजी १८-४४ वयोगटासाठी लसींचे वितरण करण्यात आले. देशात फक्त ११ राज्यांमध्ये हे डोस का दिले गेले ? असाही सवाल जयराम रमेश यांनी केला आहे. देशातल्या ११ राज्यांमध्ये अवघे ८६ हजार २३ इतक्या कमी प्रमाणात डोस दिले गेले ? असाही सवाल त्यांनी केला आहे.

कोणत्या ११ राज्यांना लसीचे डोस

एकुण ८६ हजार २३ कोरोनाविरोधी लसीचे डोस देशात देण्यात आले. त्यामध्ये ११ राज्यांची निवड केंद्रामार्फत लसीचे डोस देण्यासाठी करण्यात आली होती. त्यामध्ये छत्तीसगढ (९८७), दिल्ली (१४७२), गुजरात(५१,६२२), जम्मू आणि काश्मीर (२०१), कर्नाटक (६४९), महाराष्ट्र (१२,५२५), ओरिसा (९७), पंजाब (२९८), राजस्थान (१८५३), तामिळनाडू (५२७), युपी (१५,५७९) अशा पद्धतीने लसींचे वितरण करण्यात आले.


- Advertisement -

 

- Advertisement -