घरमहाराष्ट्रना.. ना... जागा वाटपांबाबत कोणीही बोलू नये; पटोलेंचा राऊतांना सबुरीचा सल्ला

ना.. ना… जागा वाटपांबाबत कोणीही बोलू नये; पटोलेंचा राऊतांना सबुरीचा सल्ला

Subscribe

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे 19 खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा केला. त्यामुले राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व 18 जागांवर ते लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांना इशारा दिला आहे. कोणाही जागावाटपांबाबत भाष्य करु नये , असं पटोले म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे 19 खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा केला. त्यामुले राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व 18 जागांवर ते लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांना इशारा दिला आहे. कोणाही जागावाटपांबाबत भाष्य करु नये , असं पटोले म्हणाले आहेत. ( Congress leader Nana Patole Criticised Thackeray Group leader Sanjay Raut over Loksabha Elections seat allotments )

काय म्हणाले नाना पटोले?

जागा वाटपाबाबत अजूनही काही ठरलेलं नाही. जागा वाटपांबाबत कमिटी बनवून त्यावर निर्णय घेतला जाईल. लोकसभेच्या मेरिटच्या आधारावरच जागा वाटप केलं जावं, अशी आमची भूमिका आहे. आम्ही इतक्या जागा लढवणारच आणि जिंकणारच असं वक्तव्य कोणीही करु नये, असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. जागा वाटपाबाबत चर्चा सुरु झाल्यावर कोणत्या जागा कोणी लढवाव्या हे स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं हाच मविआचा मूळ उद्देश असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. त्यामुळे जागा लढण्यापेक्षा जागा कशा जिंकल्या जातील या सर्व गोष्टींची चर्चा व्हावी, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं, नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

राऊत काय म्हणाले होते? 

महाविकास आघाडीत निवडणुकीचा कोणताही फॉर्मुला अजून ठरलेला नाही. परंतु राज्यात महाविकास आघाडी आहे आणि राहिल. लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. तसंचं, 2019 मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या 18 जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल आणि पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व 19 जण निवडून येतील, असा दावा राऊत यांनी केला होता.

( हेही वाचा: BJP : पक्ष बळकट करणं आमचं काम, चार मतदारसंघाचा आढावा घेणार – देवेंद्र फडणवीस )

- Advertisement -

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी विरोधी पक्षांसह भाजपही कामाला लागलं आहे. लोकसभेत कोण बाजी मारतं याबाबत वक्तव्यही केली जात आहेत. आता या निवडणुकीत कोण बाजी मारत तसचं, विरोधी पक्ष भाजपला कांटे की टक्कर देतो का ते पाहावं लागणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -