भाजपची हुकूमशाही व्यवस्था संपवण्यासाठी मविआ एकत्र; नाना पटोलेंचा निर्धार

राज्यातील पाच विधानपरिषदेच्या निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे. याविषयावर आज चर्चा आहे. उद्या किंवा जमलं तर आजचं पाच विधानपरिषदेच्या निवडणुकांबाबत स्पष्टता जाहीर करणार आहोत. भाजपसारख्या हुकूमशाही व्यवस्थेला संपवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवणार आहे, असा निर्धार आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

आगामी निवडणुकांबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, जागा शिवसेना जाते, काँग्रेसला जाते की, राष्ट्रवादीला जाते हा आमचा प्रश्न नाही. भाजपाची हुकूमशाही व्यवस्था संपवणं हे आमचं लक्ष्य आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत.

भाजपला नाशिकमध्ये उमेदवार मिळू शकला नाही. यातून भाजपची काय अवस्था हे स्पष्ट होतयं. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी मविआ रणनिती आखत आहे. आम्ही जाणीवपूर्वक उशीर करतो आहे. त्यामागचं कारण कळेलच, असही नाना पटोले म्हणाले.

आमची विधानसभेची पोटनिवडणूक आणि दुसरी एक चर्चा आहे, त्यामुळे उद्यापर्यंत विधानपरिषदेच्या निवडणुकाबाबतची स्पष्टता जाहीर करु. नाशिकमध्ये भाजप एक उमेदवार देऊ शकला नाही, दुसऱ्यांची घरं तोडण्याची भाजपची जी खेळी होती त्यात भाजप स्वत: फसला. मविआ आघाडी म्हणून आमची भूमिका लवकरच मांडू. काही गोष्टी या आमच्या रणनीतीचा भाग आहे. आम्हीही बघतो आहे की, काय करायचं आहे. बंडखोराला पाठिंबा देणार नाही त्यामुळे सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच संपला आहे असंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे.


बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; कुस्तीपटूंच दिल्लीत आंदोलन