ईडी सरकारची उलटी गिनती सुरु, कंबोज यांच्या आरोपांवर पटोलेंचे प्रत्युत्तर

congress leader nana patole reaction on bjp mohit kamboj tweet

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे. मोहित कंबोज काल रात्रीपासून ट्विट करत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला टार्गेट करत आहेत. काल तीन ट्विटमधून त्यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचे खळबळजनक ट्विट केल. त्यानंतर आता हर हर महादेव! अब तांडव होगा! असं नवं ट्विट त्यांनी केलं आहे. यामुळे कंबोज यांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीची बॅड मॉर्निंग सुरु झाली आहे. कंबोज यांच्या आरोपांवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु असं म्हणत नाना पटोलेंनी थेट भाजवर निशाणा साधला आहे. नाना पटोले आज अधिवेशनपूर्वी विधानसभेबाहेर बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, भाजपचं सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन गैरवापर करत आहे. आज ना उद्या त्यांना त्यांची जागा कळणार… महाविकास आघाडीचा कोणताही नेता या धमकीला आणि अशा पद्धतीच्या मानसिकतेला घाबरत नाही. त्यांनी काही बोलो… महाराष्ट्रात आता हे ईडीचे सरकार आले आहे त्यांची उलटी गिनती सुरु होणार आहे. या पद्धतीचे वातावरण, दहशत निर्माण करुन जनतेचे प्रश्न मांडण्यापासून थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न ईडी सरकारच्यावतीने करण्यात येत आहे. त्यांच्या भुर्ट्यांकडून सुरु आहे. अशा शब्दात त्यांनी मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडेंनी केली टीका

अशा प्रकारे ट्विट करत विरोधी पक्षाला बदनामा आणि दाबण्याचा प्रयत्न हे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. पण विरोधी पक्ष अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही, महाविकास आघाडी एकजुटीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहे. असं राष्ट्रवादी काँग्र्सचे नेते धनंजय मुंडे म्हणाले.


आले, आले 50 खोके आले; विरोधी पक्षाचा शिंदे गटावर हल्लाबोल