वानखेडे भाजपाचा कोण लागतो? नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या केसमधून नवनवीन ट्वीस्ट समोर येत आहेत. याचप्रकरणावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपाच्या अनेक नेत्यांवर निशाणा साधला आहे.

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग प्रकरणात किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या केसमधून नवनवीन ट्वीस्ट समोर येत आहेत. याचप्रकरणावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपाच्या अनेक नेत्यांवर निशाणा साधला आहे. वानखेडेला वाचवण्यासाठी भाजपाचे हे लोक का पुढे आलेत? वानखेडे भाजपाचा कोण लागतो? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे. (Congress Leader Nana Patole Slams BJP Devendra Fadnavis and Sudhir Munghantiwar On Sameer Wankhede)

नेमके काय म्हणाले नाना पटोले?

“वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई सुरु केली असून त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरु आहे. वानखेडेने नामांकित व्यक्तींना ब्लॅकमेल करुन माया गोळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. वानखेडेंची सीबीआय चौकशी सुरु असताना गृहमंत्री फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवारांसह भाजपाचे अनेकजण वानखेडे यांचे समर्थन करत आहेत”, असे नाना पटोले म्हणाले. तसेच, वानखेडेला वाचवण्यासाठी भाजपाचे हे लोक का पुढे आलेत? वानखेडे भाजपाचा कोण लागतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

“सरकारी सेवेत असलेला समीर वानखेडे नागपुरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला कशासाठी भेट देतो? तो कुणाला भेटला व कशासाठी? हे उघड झाले पाहिजे”, असे नाना पटोले म्हणाले.

न्यायालयाचा समीर वानखेडे यांना मोठा दिलासा

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांना 22 मे २०२३ पर्यंत अटक करु नका. त्यांनी तपासात सहकार्य करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला (CBI)दिले. याप्रकरणी न्यायालयाने सीबीआय व एनसीबीला (NCB) नोटीस जारी करत प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – मुंबईत चार फ्लॅट, महागडी घड्याळं… एवढी संपत्ती असलेल्या समीर वानखेडेंच्या आर्यन प्रकरणात नवा ट्विस्ट