घरमहाराष्ट्रराज्याची तिजोरी लुटणं हा राज्य सरकारचा अजेंडा; नाना पटोलेंची जहरी टीका

राज्याची तिजोरी लुटणं हा राज्य सरकारचा अजेंडा; नाना पटोलेंची जहरी टीका

Subscribe

महाराष्ट्रातील सरकार आता राहिलं नाही, या सरकारचं अस्तित्व आता संपल आहे. फक्त राज्याची तिजोरी लुटणं आणि त्यावर मज्जा करणं तिथपर्यंतचं हे अस्तित्वहीन महाराष्ट्रातील सरकार आहे, अशी जहरी टीका काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे. 17 डिसेंबर रोजीच्या विराट मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सर

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांसारख्या महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान भाजपा करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले आणि आता मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार सत्तेच्या गुरमीतून करत आहे. कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान केलं जात, मराठी भाषिकांना मारलं जात, छळलं जात, पण राज्यातील सरकार त्यावर बोलायला तयार नाही, त्यामुळे महाराष्ट्र द्रोही सरकारच्याविरोधात मविआ 17 डिसेंबरला मोर्चा आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील प्रकल्प गुजरातला घेऊन पळाले आणि आता मुंबईसुद्धा केंद्रशासित करून महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे. यात धारावी प्रकल्प, पोर्टच्या बाजूच्या जमिनी, विमानतळ यातून मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. धारावी प्रकल्पासाठी रेल्वेने अजून जागा दिल्या नाहीत, तरी कुठल्या आधारावर डेंटर पास झालं. त्या 10 लाख लोकांचं पूर्नवसन कसं केलं जाणार, याबाबत सर्व स्पष्टता होण्याआधी टेंडर व्हायला नव्हतं पाहिजे. याचाच अर्थ कर्नाटकला महाराष्टावर आणायचं आणि महाराष्ट्रातील गावं तिकडे द्यायची, तेलंगणाला सांगायचं तुम्ही करा, तिथे गुजरात कामाला लागलं आहे. यातून महाराष्ट्राला छिन्नविछिन्न करू महाराष्ट्राचे ह्रदय असलेल्या मुंबईला कसं वेगळं करता येईल हा सगळा प्रयोग सुरु आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

जे हिमाचल प्रदेश भाजपजवळ होतं ते काँग्रेसने जिंकले, गुजरातपूर्त आता नरेंद्र मोदींचे वलय राहिलं आहे असं चित्र देशात पाहतोय. महाराष्ट्रावर जी अत्याचाराची प्रक्रिया भाजपने केंद्रातील सत्तेच्या आधारावर सुरु केली आहे त्याचे परिणाम केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला भोगावे लागतील, अशा इशाराही नाना पटोलेंनी दिला आहे.

- Advertisement -

गुजरातच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो; गुजरात पराभवानंतर राहुल गांधींचं ट्विट

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -