घरमहाराष्ट्रज्यांना मतं फुटण्याची भीती, ते आमदारांना बसमधून आणतायतं; पटोलेंची भाजपवर टीका

ज्यांना मतं फुटण्याची भीती, ते आमदारांना बसमधून आणतायतं; पटोलेंची भाजपवर टीका

Subscribe

भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि युपीएकडून यशवंत सिन्हा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याच निवडणुकीवरून काँग्रेसचे महाराष्ट्राच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. ज्यांना मतं फुटण्याची भीती आहे. त्यांनी आमदारांना बसमधून आणलं, असा टोला नाना पटोलेंनी भाजपला लगावला आहे. निवडणुकीच्या मतदानापूर्वी पटोले विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधत होते.

ज्या लोकांना मत फुटण्याची भीती, ते लोक बसमधून सर्व आमदारांना आणत आहेत. कोणाला मत फुटण्याची भीती आहे, त्या पक्षाचे आमदार बसमधून एकत्रित आणले जात आहेत. कस त्यांना संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे ज्यांची मत फुटतात ते दुसऱ्यावर आरोप करतात हे चित्र आपण आता पाहतोय. अशी टीका पटोलेंनी भाजपवर केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात आलेल्या ईडीच्या असंविधानिक सरकारने खऱ्या अर्थाने लोकशाहीची पाळं मुळ तोडून तोडली, संविधानिक व्यवस्था न मानणारे सरकार महाराष्ट्रात आले. राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाखाली आणि पैशांच्या भरोवश्यावर राजकारण करायला निघाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आमदार फोडू असे वक्तव्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्यात. अशा शब्दात पटोलेंनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.


…उत्साही कार्यकर्त्यांमुळे शिवप्रतिमेला धक्का


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -