Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आता 'वज्रमूठ' सभा होणार नाही? नाना पटोलेंचं मोठं विधान

आता ‘वज्रमूठ’ सभा होणार नाही? नाना पटोलेंचं मोठं विधान

Subscribe

संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करु नये. संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करु नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर केला आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उफाळून आलेल्या तीव्र भावना पाहता पुण्याला होणाऱ्या वज्रमूठ सभेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मविआची स्थापना करुन त्याची अडीच वर्षे यशस्वी वाटचाल सुरु ठेवण्याचं काम शरद पवार यांनी केलं. आता त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने वज्रमूठ सभा होणार की नाही यावर शंका उपस्थित केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सामना रंगल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वज्रमूठ सभेसंदर्भात महत्त्वाचं आणि मोठं विधान केलं आहे. ( Congress leader Nana Patole talked about Vajarmuth sabha in Pune after resignation of Sharad Pawar From NCP President Post  )

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुण्यातील वज्रमूठ सभेबद्दल विचारलं असता, पावसामुळे सभेबाबतचा निर्णय एकत्रित बैठक घेऊन घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होईल. याबाबत बैठकीत निर्णय होईल. पुण्यातील वज्रमूठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही, असे विधान नाना पटोले यांनी केले. नानांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. एकाकडी पवारांचा राजीनामा आणि दुसरीकडे पुण्यातील सभेबाबत नानांचं हे विधान आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: शरद पवारांनी बाजूला होण्याचा निर्णय घेणे, ही पक्षाची हानी – जयंत पाटील )

राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करु नये

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र निर्णय राहुल गांधीचं घेतात असं वक्तव्य केलं दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावर पटोलेंनी राऊतांचा समचार घेतला. संजय राऊत यांनी आमच्या पक्षात लुडबूड करु नये. संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करु नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांवर केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -