घरमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाने भाजपशी संबंधित कंपनीला काम दिल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

निवडणूक आयोगाने भाजपशी संबंधित कंपनीला काम दिल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात काम भाजपशी संबंधित कंपनीला दिल्याचं समोर आलं. यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून भाजप पदाधिकाऱ्याला फेसबुकचं काम दिलं होतं, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. पक्ष पदाधिकाऱ्याला फेसबुकचं काम का देण्यात आलं? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. यामध्ये एखाद्या पक्षाला मदत करण्यासाठी हे करण्यात आलं, असं स्पष्ट दिसत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या अशा प्रकारामुळे निपक्षपातीपणाने निवडणूका होणार नाहीत. आणि महाराष्ट्रात २०१९ च्या निवडणुकीत असंच घडलं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं त्यांना पत्र पाठवलं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. कंपनीची निवड करताना कोणती प्रक्रिया राबवली. काम देताना राजकीय दबाव होता का? याची चौकशी व्हावी अशी मागणी करणारं पत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलं आहे.

- Advertisement -

देवांग दवे या व्यक्तिने मेंबर आयटी बोर्ड, महाराष्ट्र सरकार हे पद वापरलं आहे. हे खोटं आहे, महारष्ट्र सरकारने याची चौकशी केली पाहिजे, की असं बोर्ड आहे का? भाजप सरकारच्या काळात तयार केलं होतं का? हे सरकारी आहे की खासगी आहे? या व्यक्तीला कोणी सभासद केलं, याची चौकशी झाली पाहीजे, असं पृथ्विराज चव्हाण म्हणाले. हा सर्व घडलेला प्रकार वाईट आहे. या प्रक्रियेमध्ये असलेले सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पृथ्विराज चव्हाण यांनी केली आहे. भाजप सरकारनं घटनात्मक संस्थांना निष्प्रभ केलं, असा आरोप चव्हाण यांनी भाजपवर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -