घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर; म्हणाले, त्यांना बोलण्याचा अधिकार...

शरद पवारांच्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर; म्हणाले, त्यांना बोलण्याचा अधिकार…

Subscribe

शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे. ते बोलले तरी मला त्याचं काही वाटत नाही. मी बरचं काही सहन केलेलं आहे. शरद पवारांना वडिलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर म्हणून शरद पवार यांनी चव्हाणांचं पक्षात काय स्थान आहे, असं म्हणत टीकास्त्र डागलं होतं आता याला पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ( Congress leader Prithviraj Chavan Gave reply to Sharad pawar over Criticism )

नेमकं प्रकरण काय?

या सगळ्याला सुरुवात शरद पवारांच्या राजीनाम्यानंतरच्या चर्चांनी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाबरोबर प्लॅन बी सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरुन राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्यानंतर त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली होती.

- Advertisement -

काही लोकांची पक्की मतं असतात. ती पक्की मतं असणाऱ्यांपैकी ज्यांचं नाव आपण घेतलं ते गृहस्थ आहेत. त्यांच पक्क मत असं असतं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येकवेळी मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला की, त्यांचं मत आमच्याबाबत प्रतिकूल असतं. त्यामुळे आम्ही त्याची कधी गांभीर्याने नोंद घेत नाही आणि लोक किती गांभीर्याने घेतात हे मला माहिती नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

पृथ्वीराज चव्हाण यांचं काँग्रेसमध्ये स्थान काय? असं म्हटलं. ए.बी.सी.की.डी आहे ते एकदा तपासावे. त्यांच्या पक्षातील एका सहकार्याला विचारले यांची कॅटगरी कोणती आहे, ते तुम्हाला समजेल. पण ते खासगीत सांगतील. जाहीर करणार नाहीत.

- Advertisement -

मला त्याचं काहीच वाटत नाही

शरद पवार यांच्या टीकेवर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिलं आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे. ते बोलले तरी मला त्याचं काही वाटत नाही. मी बरचं काही सहन केलेलं आहे. शरद पवारांना वडिलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणाच्या आरोपपत्रात अनिल परबांचं नावच नाही? सोमय्यांना धक्का! )

महाविकास आघाडी मजबूत व्हावी. कोणीतरी मंत्री व्हावं, कोणालातरी पद मिळावं यासाठी महाविकास आघाडी झालेली नाही. भाजपचा विषारी विस्तार थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. या प्रयत्नांना कोणीही अपशकुनी करु नये, अशी माझी प्रामाणिक भावन आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -