Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र इंधन दरवाढीवर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार गप्प का? काँग्रेस नेत्याचा सवाल

इंधन दरवाढीवर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार गप्प का? काँग्रेस नेत्याचा सवाल

Related Story

- Advertisement -

देशात पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक तेलांच्या किंमतीनी सध्या शंभरी गाठली आहेत. यावर बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारसह इतर बॉलिवूड कलाकार अद्याप गप्पा का असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. यावर पुढे बोलताना पटोले म्हणाले, नेहमी अनेक घटनांवर व्यक्त होणारे बॉलिवूड कलाकारा मात्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर मात्र गप्प आहेत असेही पटोले म्हणाले. एका मुलाखतीच्या कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते.

यावेळी बोलताना असे म्हणाले की, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारसारख्या कलाकारांनी जेव्हा पेट्रोलची किंमत ७० रुपये प्रतिलीटर होते तेव्हा ट्वीट केले होते. मात्र आता पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली तरी गप्प का आहेत ? का त्यांच्यात हुकुमशाही मोदी सरकारविरोधात बोलण्याची हिंमत नाही का? असा सवाल करत टीका केली. तसेच सरकार लोकशाहीने काम काम करते त्यामुळे केंद्र सरकारशी कलाकार दरवाढीच्या मुद्द्यावर बोलू शकतात. असे पटोले म्हणाले. केंद्र सरकार सामान्य जनतेला त्रास न देता पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या गॅसच्या किमती कमी करव्यात असे आवाहन केले आहे.


हेही वाचा- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

 

- Advertisement -