राहुल गांधींना लग्नासाठी हवी अशी मुलगी; पहिल्यांदाच सांगितली मनातली गोष्ट

congress leader rahul gandhi revealed for the first time how he wants a girl for marriage

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेनिमित्त कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवास करत आहेत. राहुल गांधींच्या या प्रवासादरम्यान अनेक किस्से, घटना समोर येत आहेत. यातच आता राहुल गांधी यांच्या लग्नाचा मुद्दा चांगलाच गाजतोय. राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच लग्नासंदर्भात आपलं मनं मोकळं केलं आहे. आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या गुणांचा मिलाफ असलेली मुलगी मला लग्नासाठी हवी आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एका युट्युब चॅनलच्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. राहुल गांधींना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, माझी आजी माझ्या आयुष्यातील प्रेमाची व्यक्ती होती. ती माझ्यासाठी दुसरी आई होती. ज्यावर इंदिरा गांधींचे गुण असलेल्या मुलीशी लग्न करायला आवडेल का? असे दुसरा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, ज्यावर ते म्हणाले की, हा एक चांगला प्रश्न आहे, मला अशी मुलगी हवी आहे जिच्यात माझ्या आजीचे आणि आईचे गुण एकत्रित असले पाहिजे.

दरम्यान विरोधकांकडून राहुल गांधी यांचा पप्पू पप्पू म्हणून उल्लेख केला जातो. ज्यावर राहुल गांधी म्हणाले की, कोणी मला पप्पू म्हटले तरी मला वाईट वाटत नाही, कारण हा सर्व प्रचाराचा भाग आहे आणि असे बोलणारे स्वत:च त्रस्त आणि घाबरलेले आहेत. जो बोलत आहे त्याच्या मनात भीती आहे. त्याच्या आयुष्यात काहीच नाही, त्याचे संबंध चांगले चालले नाहीत. जर मला शिवी देण्याची गरज असेल तर मला शिवी द्या, मी त्याचे स्वागत करेल, मी कोणाचाही द्वेष करत नाही, तुम्ही मला शिव्या द्या, मी तुमचा तिरस्कार करणार नाही. असंही राहुल गांधी म्हणाले.

या मुलाखतीत कार आणि बाईकबाबतही राहुल गांधी यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, माझ्याकडे स्वत:ची कोणतीही कार नाही. परंतु माझ्या आईकडे एक कार आहे. जेव्हा मी लंडनला राहत होतो, तेव्हा मी आरएस-२० बाईक चालवायचो, ते माझ्या आयुष्यातील एक प्रेम आहे.

यावेळी राहुल गांझी यांनी आपल्या सायकल चालवण्याच्या आवडीबाबतही माहिती दिली. राहुल गांधी म्हणाले की, एकेकाळी लॅम्ब्रेटा (स्कूटर) देखील माझी आवडती होती, भारतात आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि ड्रोनमध्ये भारत अजूनही मागे आहे. असही त्यांनी नमूद केले.


मुंबईतील समता गृहनिर्माण संस्थेची स्वतंत्र चौकशी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती