घरमहाराष्ट्रRajni Satav : काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे निधन; 76 व्या वर्षी...

Rajni Satav : काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे निधन; 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

नांदेड : माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या रजनी सातव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात त्यांना आज सकाळीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. काँग्रेसचे माजी मंत्री आणि दिवंगत राजीव सातव यांच्या त्या मातोश्री होत्या. (Congress leader Rajni Satav passes away He took his last breath at the age of 76)

हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून इशारा; अजित पवार-पाटील संघर्ष पेटणार?

- Advertisement -

सातव घराणे हे मागील 43 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांच्या कुटुंबाला ओळखले जाते. रजनी सातव यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या मूळच्या पुण्याच्या होत्या. रजनी सातव या 1980 ते 90 कळमनुरीतून विधानसभा, तर 1994 ते 2000 या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या आमदार होत्या. याशिवाय त्यांनी आरोग्य राज्यमंत्रीपद देखील भूषवलेले होते. काँग्रेसमध्ये प्रदेश संघटनेत त्यांनी अनेक वर्षे काम केले.

काँग्रेस पक्षात ज्येष्ठ नेत्या म्हणून काम करत असताना त्यांनी आपले चिरंजीव दिवंगत राजीव सातव यांना संघटनेच्या कामात सक्रिय केले. रजनी सातव यांच्या मागे त्यांची सून डॉ. प्रज्ञा सातव, दोन नातवंडे असा परिवार आहे. प्रज्ञा सातव यादेखील काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत. दरम्यान, रजनी सातव यांच्यावर उद्या (सोमवारी) दुपारी 12 वाजता कळमनुरीमधील विकास नगर याठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : खोटं बोला पण रडून बोला; आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

नाना पटोले यांनी वाहिली श्रद्धांजली

नाना पटोले यांनी ट्वीट करताना म्हटले की, दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या मातोश्री महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. रजनी सातव यांचे ह्रदय विकाराने आज दुःखद निधन झाले. आमदार डॅाक्टर प्रज्ञा सातव आणि संपूर्ण सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -