भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे वॉशिंग मशीन भाजपाकडेच, सचिन सावंतांची टीका

Congress

आज शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्तार कार्यक्रमात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान विजयकुमार गावित, संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्या आला आहे. यावरून काँग्रेसने शिंद आणि फडणवीस सरकारवर टीका केली. याबाबत ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

ट्विटमध्ये काय? –

या ट्विटमध्ये भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपा कडेच आहे हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात ही स्पष्ट झाले विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते, असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.

 सचिन सावंत यांनी दील्या होत्या शुभेच्छा –

दरम्यान काल सचिन सावंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अब्दुल सत्तार यांना टोला लगावला होता. या ट्विटमध्ये ७२ तासांत मंत्री होणाऱ्यांना आता मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता तरी कुडमुड्या ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत दादा पाटील विज्ञानवादी दृष्टीने व अब्दुल सत्तार हिंदूत्वाच्या उद्धारासाठी समर्पित होऊन काम करतील ही अपेक्षा व शुभेच्छा, असे म्हटले होते