Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस'; काॅंग्रेस नेत्यांची जीभ घसरली

‘नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस’; काॅंग्रेस नेत्यांची जीभ घसरली

Subscribe

यवतमाळमध्ये कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या जनसंघर्ष यात्रेत मंचासमोर असलेले कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना कॉंग्रेसचे नेते वसंत पुरके आणि शिवाजीराव मोघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.

यवतमाळमध्ये कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या जनसंघर्ष यात्रेत मंचासमोर असलेले कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना कॉंग्रेसचे नेते वसंत पुरके आणि शिवाजीराव मोघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मोदींवर टीका करताना या दोनही नेत्यांची जीभ घसरली. नरेंद्र मोदी हे नालायक आणि भिकार माणूस आहेत, अशी टीका या दोघांनी मंचावर केली. यावेळी कॉंग्रेसचे खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रिय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार नसीम खान, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आणि कॉंग्रसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – ३० वर्षांपूर्वी निधन झालेल्या माझ्या वडिलांना राजकारणात कशाला खेचता? – मोदी

मोदींवर वैयक्तीक पातळीवर टीका

- Advertisement -

राजकारणात आता आरोप-प्रत्यारोपांनी परिसिमाच गाठली आहे. हे आरोप आता पक्षा-पक्षांत मर्यादित न राहता वैयक्तिक पातळीवर येऊन ठेपले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे. भर प्रचारसभेत मोदी यांच्या आई आणि वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. आता या सर्वच वादग्रस्तांच्याही पुढे जाऊन कॉंग्रेसचे नेते वसंत पुरके म्हणाले आहेत की, नरेंद्र मोदींसारखा भिकारी माणूस या देशात झाला नाही. पुरके यांच्यापाठोपाठ कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी मोदींच्या विरोधात टीकेचा सूर धरला. ते म्हणाले की, देशवासीयांनी नरेंद्र मोदींना मोठ्या अपेक्षाने सत्ता दिली. मात्र हा माणूस नालायक निघाला, असे मोघे म्हणाले.


हेही वाचा –  माझ्या आईला राजकारणात का खेचता – नरेंद्र मोदी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -