काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; राहुल गांधी संध्याकाळी घेणार भेट

congress leader sonia gandhi admitted in sir gangaram hospital for routine checkup

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नियमित तपासणीसाठी त्या रुग्णालयात त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. थंडीमुळे श्वास घेण्यास त्रास जाणवून लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे सांगितले जात आहे. सोनिया यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रियांका गांधी वढ्रादेखील उपस्थित आहेत.

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात सुरु आहे, मात्र यात्रेतून आज संध्याकाळी राहुल गांधी दिल्लीत दाखल होत रुग्णालयात आईची भेट घेणार आहेत. दरम्यान सोनिया गांधी यांनी अलीकडे दिल्लीत पोहचलेल्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. मुलगा राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी काही वेळ प्रवास केला. यावेळी राहुल गांधी आई सोनिया गांधी यांच्या बुडाची लेस बांधताना दिसले, ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

दरम्यान आज काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ उत्तर प्रदेशचे जाटलँड बागपतमध्ये पोहोचली आहे. बागपत येथील मावी कलान येथे रात्रीच्या विश्रांतीनंतर पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 6 वाजता पुन्हा सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक दल (RLD) अध्यक्ष जयंत चौधरी या यात्रेत सहभागी झाले नाहीत. मात्र रालोदच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते त्यात सहभागी झाले आहेत.

जयंत चौधरी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढ्रा सकाळी दिल्लीहून मावी कलान येथे पोहोचल्या आणि पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार सहा वाजल्यापासून पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. प्रियांका सकाळच्या यात्रेत सहभागी झाल्या नाहीत. मात्र लवकरंच त्या या यात्रेत सहभागी होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.


त्या’ विधानामागे क्लुप्ती लढवणारा मास्टर माइंड सभागृहात नव्हता; अजित पवारांचा कोणावर रोख?