घरमहाराष्ट्रपक्ष सोडल्याबरोबर खुर्च्याही पळवल्या; औरंगाबादेत सत्तारांचा प्रताप

पक्ष सोडल्याबरोबर खुर्च्याही पळवल्या; औरंगाबादेत सत्तारांचा प्रताप

Subscribe

औरंगाबादमधील गांधी भवनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्तीत बैठक पार पडणार होती. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अब्दुर सत्तार यांनी तेथून ३०० खुर्च्या पळवल्याचा प्रकार समोर आला आहे.

एखाद्या सांस्कृतिक किंवा सामुहिक कार्यक्रमात नेहमी तोच व्यक्ती शेवटपर्यंत बसलेला असतो ज्याच्या सतरंज्या या कार्यक्रमांनंतर त्याला घेऊन जायचा असतात. आपली सभा आपल्या खुर्च्या, असा काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. औरंगाबादमधील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्ष सोडताच आपापल्या वस्तूदेखील ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आज, मंगळवारी औरंगाबादमधील गांधी भवनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्तीत बैठक पार पडणार होती. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अब्दुर सत्तार यांनी तेथून ३०० खुर्च्या पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी गांधी भवनातील बैठक रद्द करून दुसरीकडे बैठक घेण्याची नामुष्की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली.

काय आहे प्रकरण

काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी रात्री आमदारीचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत लोकसभेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गांधी भवनात असलेल्या खुर्च्या त्यांनी त्यांच्या कार्यालयात हलवल्या आहेत. त्या माझ्या खुर्च्या होत्या. आता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मला कार्यालयात काही वस्तू लागणार त्याची सोय मलाच करावी लागणार आहे. तेव्हा काँग्रेसने लोकसभेला उमेदवारी दिलेल्यांनी त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करावी, असा टोला अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला लगावला आहे.

- Advertisement -

काँग्रेसवर नाराज अब्दुल सत्तार

लोकसभेच्या तिकीटावरून नाराज असलेल्या काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच आपण औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. भाजपमध्ये सुरु असलेल्या इन्कमिंगमध्ये अब्दुल सत्तार यांचे नाव सहभागी होणार का? याबाबत चर्चा सुरु असतानाच त्यांनी, मी भाजपमध्ये जाणार नाही, हेदेखील स्पष्ट केले. औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यामुळे काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारले होते. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -