घरमहाराष्ट्रमुंबई : काँग्रेसचा मशाल मोर्चा पोलिसांनी अडवला, महात्मा गांधींच्या पणतूसह शेकडो कार्यकर्त्यांना...

मुंबई : काँग्रेसचा मशाल मोर्चा पोलिसांनी अडवला, महात्मा गांधींच्या पणतूसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक

Subscribe

महात्मा फुले जयंतीनिमित्त माहिम येथील मृदुंगाचार्य नारायणराव कोळी मैदानातून हा मोर्चा निघणार होता. हातात मशाल घेऊन अहिंसेच्या मार्गाने माहीम कॉज वे, कॅडल रोड, हिंदुजा हॉस्पिटल, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करुन मोर्चाची सांगता होणार होती. मात्र माहिम येथेच मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Mumbai Congress Mashal marcha | मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वात निघालेला मशाल मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. महात्मा फुले जयंतीनिमित्त देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक घोटाळे, सामाजिक अशातंता, महिला असुरक्षा, देशातील हुकुमशाही, भष्ट्राचारी केंद्र व राज्य सरकार यांच्या विरोधात आणि लोकशाही वाचविण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी रोखला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी, आरपीआयचे राजेंद्र गवई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, जनता दल, जेडीएसच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. (Congress Mashal march stopped by police, hundreds of workers arrested including Mahatma Gandhi’s great-grandson)

महात्मा फुले जयंतीनिमित्त माहिम येथील मृदुंगाचार्य नारायणराव कोळी मैदानातून हा मोर्चा निघणार होता. हातात मशाल घेऊन अहिंसेच्या मार्गाने माहीम कॉज वे, कॅडल रोड, हिंदुजा हॉस्पिटल, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करुन मोर्चाची सांगता होणार होती. मात्र माहिम येथेच मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

मोदी सरकार आणि राज्य सरकारचा निषेध – तुषार गांधी
या मोर्चाला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी देखील उपस्थित होते. ते म्हणाले, लोकशाहीमध्ये अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण ज्या प्रकारे पोलिसांना पुढे करून दडपशाही पद्धतीने आमच्या मशाल मोर्चाला अडवण्यात आले. आम्हाला मोर्चा काढण्यापासून रोखण्यात आले, याबद्दल मी केंद्रातील मोदी सरकारचा व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो.
काँग्रेसच्या या मशाल मोर्चात मोठ्या संख्येने सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते, मात्र मोर्चा सुरु होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावर भाई जगताप म्हणाले, ‘आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार देशाच्या संविधानाने दिलेला आहे. पण आमच्या शेकडो लोकांना अटक करण्यात आली. आमच्या शेकडो गाड्या अडवल्या. पण तरीसुध्दा काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षाचे हजारो कार्यकर्ते आज येथे उपस्थित आहेत.’

- Advertisement -

‘महागाई, बेरोजगारीचा आगडोंब आणि कायदा सुव्यवस्थेचा धाब्यावर’
आपण जे मागील 9 वर्षांपासून भोगत आहोत. देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसविण्यात आली आहे. देशामध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकारने व राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने गुंडगिरी करून लोकशाही धाब्यावर बसवली आहे, असा आरोप भाई जगताप यांनी केला.
ते म्हणाले, ‘लोकशाहीची व संविधानाच्या मूल्यांची दिवसागणिक हत्या होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉर्ड मध्ये कार्यकर्त्यांना मारहाण होते. ही दादागिरी, गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही. आम्ही अहिंसेच्या मार्गाने मशाल मोर्चा काढला तर आम्हाला काढू दिला जात नाही. आमच्या कार्यकर्त्यांना अडवून अटक केली जाते. एवढी या सरकारला कसली भीती वाटते? पण काहीही झाले तरी तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही,’ असा इशारा त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला दिला.

लोकशाही मार्गाने निघालेला काँग्रेसचा मोर्चा अडवून संविधान संपवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जगताप म्हणाले, हा मोर्चा म्हणजे देशातील 140 कोटी जनतेचा आवाज आहे आणि हीच जनता एक दिवस यांना आडवे केल्याशिवाय शांत बसणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -