घरमहाराष्ट्रलोकसभेसाठी काँग्रेसने कसली कंबर

लोकसभेसाठी काँग्रेसने कसली कंबर

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नोव्हेंबरमध्ये प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठक घेण्याचे योजले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी १५, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे बैठक घेण्याचे योजले आहे. या बैठकांमध्ये राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने लोकसभा २०१९ च्या निवडणूकीसाठी कंबर कसली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

असे आहे बैठकीचे वेळापत्रक

गुरुवार १५ नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभाग यांची बैठक पार पडणार असून ती सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजता पार पडणार आहे. तर दुपारी २ ते ५.३० या वेळेत पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक होणार आहे. तर शुक्रवारी १६ नोव्हेंबर रोजी विदर्भ विभागाची सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत बैठक होणार असून उत्तर महाराष्ट्र विभागाची दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत बैठक पार पडणार आहे. तर शेवटच्या दिवशी फक्त कोकण विभागाची बैठक सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -