ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक; दिल्लीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन

दरम्यान दिल्लीतही ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले

congress mla mp workers protest againts sonia gandhi ed inquiry in maharashtra delhi nagpur

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. त्यानुसार सोनिया गांधी चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान ईडीच्या कारवाई विरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली असून दिल्लीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.  दिल्लीच्या संसदेतही काँग्रेस खासदारांनी ईडी कारवायांविरोधात शांततेत आंदोलन केले. तर केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेस नेत्यांनीही मुंबईच्या ईडी कार्यालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन केले. सकाळी 11 वाजता जीपीओ चौकातून निघालेल्या या मोर्चात अनेक काँग्रेस नेते सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या दडपशाही व जनविरोधी निर्णयांच्या विरोधात सातत्यपूर्ण आवाज उठविणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मोदी सरकारच्या ईडीने एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्याचा आरोप काँग्रेस कर्त्यांनी केला आहे. याच निषेधार्थ संपूर्ण देशात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी माजी आमदार, खासदार, माजी मंत्री, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील आंदोलनात सहभागी झाले होते.

सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत मुंबईत काँग्रेस नेत्यांकडून केले जातेय. सीएसएमटी परिसरात काही काँग्रेस आंदोलकांनी जमा होत केंद्राविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली.

यावेळी भाई जगताप, नाना पटोलो, झिशान सिद्दीकी यांच्यासह काही आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी गाडीसमोर निषेध केला, मात्र पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाजूला केले आहे. त्यामुळे काही वेळ पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर दुसरीकडे नागपूरमधील ईडी कार्यालयावरही काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केले. दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसकडून ईडीविरोधात आंदोलनं केली जात आहे.

दरम्यान दिल्लीतही ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी हे तीव्र आंदोलन केले, यावेळी पोलिसांकडून मात्र त्यांना  ताब्यात घेण्यात आहे. देशात एजन्सींचा गैरवापर होत आहे… लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा हक्क आहे, पण तोही चिरडला जात आहे…आरोप आता काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे.

सोनिया गांधींची बदनामी करण्याचा प्रयत्न – नाना पटोले

ईडी ज्या प्रकारे सोनिया गांधींना वागवत आहे, ते त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार केंद्रीय यंत्रणांचा काँग्रेसविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

आपण एकमेकांवर राग काढण्यासाठी कारवाई करायला लागलो तर ते योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि आमदार अस्लम शेख यांनी दिली आहे.

जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेसचं आंदोलन 

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने समन्स बजावलेल्या सोनिया गांधींच्या समर्थनार्थ देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून जम्मू काश्मीरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.


पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत? शिक्षण आयुक्तांचा शासनाला प्रस्ताव