Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची बेळगावातील सभा उधळवली; कर्नाटकातलं राजकारण तापलं

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची बेळगावातील सभा उधळवली; कर्नाटकातलं राजकारण तापलं

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदारा प्रचाराला सुरूवात केली आहे. आमदार प्रणिती शिंदे बेळगावमध्ये एका सभेसाठी गेल्या होत्या. मात्र, प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ही सभा उधळून लावल्याची माहिती आहे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदारा प्रचाराला सुरूवात केली आहे. आमदार प्रणिती शिंदे बेळगावमध्ये एका सभेसाठी गेल्या होत्या. मात्र, प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ही सभा उधळून लावल्याची माहिती आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. (Congress MLA Praniti Shinde rally in Belgaum was blocked by Marathi ekikaran samiti workers)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह मराठी भाषिक सभास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत सभा उधळून लावली. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची एक सभा बेळगाव जवळच्या देसूर गावात आयोजित करण्यात आलेली होती. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत स्पष्टीकरण कुणीही दिलेले नाही.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

तिथल्या काही मराठी भाषिकांचा कल हा मराठी माणसांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिशेला झुकतो. कर्नाटकातील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील उमदेवार निवडणूक लढवत आहेत. असं असताना महाराष्ट्रातील नेते काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जात असल्याने काही मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. यातूनच बेळगावात प्रणिती शिंदे यांच्या सभेत गदारोळ झाला.

- Advertisement -

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे ला मतदान पार पडणार आहे. तर 13 मे रोजी या निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.


हेही वाचा – ‘भाजपा प्रत्येक मुस्लिमाला दहशतवादी ठरवण्याचा…’, बिलावल भुट्टोंची भारत दौऱ्यावरून परतताच टीका

- Advertisment -