घरदेश-विदेशगोव्यातील काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर

गोव्यातील काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर

Subscribe

काँग्रेसचे मायकल लोबो यांची हकालपट्टी

गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आमदारांचा हा गट गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर गोवा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत दिली. गेले काही दिवस सुरू असलेल्या नाराजीनाट्याने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते पक्षांतर करीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे.

- Advertisement -

काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर गोवा काँग्रेसमधील ११ पैकी ९ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी आल्यानंतर काँग्रेसचे इतरही आमदार त्यात सामील झाले. त्यामुळे काँग्रेसमधील फूट अटळ असल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडींकडे पाहता भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पुढील कार्यवाहीसाठी गोव्यात दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -